आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील एका सरकारी कोविड रूग्णालयात काल प्राणवायू न मिळाल्यामुळे १६ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या १६ रुग्णांचा मृत्यू हा प्राणवायूअभावी झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा आरोप फेटाळत रूग्णांचे मृत्यू प्राणवायूच्या तुटवड्यामुळे झाले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर सहजिल्हाधिकार्यांनी रूग्णालयास भेट देऊन प्राणवायू पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली व प्राणवायू पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.