आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवली

0
116

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमाने आणि मालवाहतूक विमानांना यातून वगळण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

नवीन कोरोनाबाधित २०
भारतात ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या नव्या रुपाची बाधा झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये आढळलेल्या सहाजणांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.