आंतरराष्ट्रीय लेखक-वाचक महोत्सवाचे भोंगळ आयोजन

0
109

लाखोंच्या अपव्ययाच्या प्रतिक्रिया
गोवा कला अकादमी संकुलात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय लेखक-वाचक महोत्सवाला अत्यंत निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याने दीनानाथ मंगेशकर सभागृहातील सर्व कार्यक्रम कृष्ण कक्षात हलविण्याची पाळी आयोजकांवर आली. त्यामुळे लाखो रुपये खर्चाचा अपव्यय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
येस बँकेने पुरस्कृत केलेल्या या महोत्सवासाठी गोवा कला अकादमीने दीनानाथ मंगेशकर सभागृहासह अन्य जागा मोफत देण्यात आली आहे. गोवा सरकारलाही आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव दिला आहे. ते मिळाले नव्हते. त्यामुळे ते मिळविण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न चालू असल्याचे कळते.
या महोत्सवाला देश-विदेशातून लेखक आले असले तरी स्थानिक तसेच अन्य देशी लेखकांना योग्य पध्दतीने निमंत्रणेच मिळाली नाहीत. महोत्सवाचे संचालक अहलम अनिल कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्यातील काही लेखकांची नावे जाहीर करण्यात आली होती. वरील नावे वर्तमानपत्रात छापून येईपर्यंत बहुतेकांना महोत्सवाची पूर्ण माहितीही नव्हती. त्यामुळे काही लेखकांनी तेथे न फिरकणेच पसंत केले.
संचालक अहलम अनिल कुमार यांच्याशी काल संपर्क केला असता, त्यांनी पुढील वेळी आयोजनात सुधारणा होईल, असे सांगितले. या महोत्सवासाठी बाहेरून आलेले साहित्यिक आपल्या विषयांकडे गंभीर आहेत. परंतु वाचकांचा प्रतिपादच नसल्याने लेखकांची बौध्दिके लेखकांनाच ऐकावी लागली.