असह्य उकाड्यामुळे शाळा आठवडाभर बंद ठेवा

0
6

>> एनएसयूआयची निवेदनाद्वारे शिक्षण संचालकांकडे मागणी

राज्यातील असह्य अशा उष्णतेच्या लाटा व पावसाला झालेला विलंब या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवण्यात याव्यात, अशी मागणी एनएसयूआयचे राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याकडे केली आहे.

आपल्या निवेदनात चौधरी यांनी म्हटले आहे की, पावसाचा अभाव व तशातच असह्य अशी उष्णता यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे कठीण झाले आहे. या उष्णतेच्या वातावरणात वर्गांत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्याही निर्माण होण्याची भीती आहे. असह्य उकाड्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकणार नसल्याचेही त्यांनी निवेदनातून म्हटले आहे.
कडक उन्हातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना डिहाइड्रेशन व उष्माघात होण्याची भीती नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शाळांचे वर्ग आठवडाभरासाठी बंद करण्यात यावेत, अशी मागणी एनएसयूआयने केली आहे.