अर्थसंकल्प ५ जुलै रोजी

0
190

खातेवाटप जाहीर होताच मोदी सरकारने संसदेच्या अधिवेशनाची तारीख जाहीर केली असून १७ जून ते २६ जुलैपर्यंत संसदेचे अधिवेशन चालेल. यादरम्यान ५ जुलैला अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. संसदेचे अधिवेशन १७ जूनला सुरू झाल्यानंतर १९ जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. संसदेचे संयुक्त सत्र २० जूनला होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे यावेळी अभिभाषण होईल.