अमली पदार्थ प्रकरणी विदेशी नागरिकास अटक

0
71

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने रविवारी रात्रौ ११ ते सोमवारी पहाटे ३ च्या दरम्यान पाटो येथील वस्तुसंग्रहालयाजवळ पॅट्रिक इलिग्वे या विदेशी नागरिकाला १४० ग्राम कोकेनसह अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून ५ हजार रु. रोख, दोन मोबाईल संच व पारपत्र हस्तगत केले. आरोपीला कोठडीत ठेवण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास चालू आहे.