अमली पदार्थप्रकरणी दलालांच्या अटकेची मागणी

0
81

अमली पदार्थांच्या बाबतीत मुख्यमंत्री पर्यटकांना दोष देतात, हे चुकीचे आहे. सरकारने अमली पदार्थांचा गैरव्यवहार करणार्‍या दलालांना अटक करावी, अशी मागणी कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काल केली. हणजूण, वागातोर, कळंगुट या भागात अमली पदार्थांचा मुक्तपणे वापर होतो. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार चालतो. आपण आमदार असताना विधानसभेत अनेक वेळा हा विषय उपस्थित केला होता, असे ते म्हणाले. सामान्य लोकांना किनार्‍यावर प्रवेश करण्यासही मज्जाव केला जातो, सनबर्नला विरोध करणारे लोक आता अशा उत्सवांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.