अफगाणिस्तानी युवकाचे हरवळे धबधब्यात बुडून निधन

0
110

हरवळे धबधब्यावर आलेल्या पर्यटकांपैकी अङ्गगाणिस्तान येथील हसीङ्ग महम्मद युसूङ्ग (२९) युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक इतर दोन युवकांसमवेत हरवळे येथे आले असता त्यानी नदीत उडी घेतली, सदर इसम पट्टीचा पोहणारा असूनही पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. काल सकाळी भारतीय नौदलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. नौदलाचे एस. के. यादव, अनिल सिंग, अंकित कुमार, एन. के. नायर व डिचोलीचे उपनिरीक्षक प्रितेश माडगावकर यांनी मृतदेह बाहेर काढला.
सदर मृतदेह गोमेकॉ शवागृहांत ठेवण्यात आला असून नातेवाईकाना कळविण्यात आले आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.