अफगाणिस्तानला विजेतेपद

0
112

अफगाणिस्तानने वेस्ट इंडीजचा ७ गडी व ५६ चेंडू राखून पराभव करत विश्‍वचषक पात्रता स्पर्धेत जिंकली. वेस्ट इंडीजने विजयासाठी ठेवलेले २०५ धावांचे माफक लक्ष्य अफगाण संघाने ४०.४ षटकांत केवळ ३ गडी गमावून गाठले.
सलामीवीर मोहम्मद शहजाद याने ८४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, मुजीब रहमानच्या गोलंदाजीसमोर विंडीजचा संघ पूर्ण पन्नास षटकेदेखील टिकला नाही. तब्बल १९ चेंडू शिल्लक असताना त्यांचा डाव आटोपला. अर्धशतकी खेळी केलेला शहजाद सामनावीर तर झिंबाब्वेचा सिकंदर रझा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

राशिदचे वेगवान १०० बळी
अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी सामन्यांत शंभर बळी घेण्याचा विक्रम काल आपल्या नावे केला. राशिदने आपल्या ४४व्या सामन्यात शतकी बळी घेतला. आपल्या तिसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शेय होपला त्याने बाद करत बळींचे शतक पूर्ण केले. ५० बळींसाठी राशिदला २६ सामने लागले होती. पुढील पन्नास बळी त्याने केवळ १७ सामन्यांत घेतले. सर्वांत वेगवान शंभर बळींचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर होता. त्याने ५२ सामन्यांत बळींची शंभरी पूर्ण केली होती. सर्वांत कमी सामन्यांत शंभर बळी घेणार्‍यांमध्ये सकलेन मुश्ताक (५३ सामने), शेन बॉंड (५४ सामने) तसेच ब्रेट ली (५५ सामने) यांचादेखील नंबर लागतो.

धावफलक
वेस्ट इंडीज ः ख्रिस गेल झे. शर्फुद्दिन गो. मुजीब १०, इविन लुईस झे. शहजाद गो. गुलबदिन २७, शेय होय पायचीत गो. राशिद २३, मार्लन सॅम्युअल्स झे. रहमत गो. गुलबदिन १७, शिमरॉन हेटमायर झे. शहजाद गो. शर्फुद्दिन ३८, जेसन होल्डर धावबाद ०, रोव्हमन पॉवेल त्रि. गो. मुजीब ४४, कार्लोस ब्रेथवेट झे. स्टॅनिकझाय गो. दौलत १४, ऍश्‍ले नर्स नाबाद २६, किमो पॉल पायचीत गो. मुजीब ०, किमार रोच त्रि. गो. मुजीब ०, अवांतर ५, एकूण ४६.५ षटकांत सर्वबाद २०४
गोलंदाजी ः दौलत झादरान ७-०-२६-१, मुजीब उर रहमान ९.५-०-४३-४, गुलबदिन नैब ५-०-२८-२, ंमोहम्मद नबी ९-१-३७-०, शर्फुद्दिन अश्रफ ७-०-२६-१, राशिद खान ९-०-४२-१.

अफगाणिस्तान ः मोहम्मद शहजाद झे. होल्डर गो. गेल ८४, गुलबदिन नैब झे. गेल गो. पॉल १४, रहमत शहा यष्टिचीत होप गो. गेल ५१, समिउल्ला शेनवारी नाबाद २०, मोहम्मद नबी नाबाद २७, अवांतर १०, एकूण ४०.४ षटकांत ३ बाद २०६. गोलंदाजी ः किमार रोच ५-०-२४-०, जेसन होल्डर ६-०-४५-०, कार्लोस ब्रेथवेट ६-०-३७-०, किमो पॉल ८-०-२९-१, ऍश्‍ले नर्स १०-२-३१-०, ख्रिस गेल ५.४-०-३८-२.