गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या गेल्या वर्षी झालेल्या हत्येचा मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनमोलला अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनमोलवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याला कोणाच्या ताब्यात द्यायचे याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. संबंधित अधिकारी अनमोलला घेऊन काही तासांत दिल्लीत पोहोचतील.