अनअकॅडेमी, टाटा मोटर्स, ड्रीम ११ने सादर केले दस्तावेज

0
581

युनायटेड अरब अमिरात (यूएई) मध्ये होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वासाठी अनअकॅडेमी, टाटा मोटर्स आणि ड्रीम ११ या दोन कंपन्यांनी काल शेवटच्या दिवशी आपल्या निविदा सादर केल्या. दोन्ही कंपन्यांनी आपले आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी दस्तावेज (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) सादर केले आहेत.

कोरोना महामारीच्या देशातील वाढत्या संक्रमणामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत यूएईत खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर देशभरातून झालेल्या विरोधामुळे बीसीसीआयने आयपीएलचे शीर्षक प्रायोजक असलेल्या विवो या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार वर्षभरासाठी स्थगित केला. विवो कंपनीचा आयपीएलचे शीर्षक प्रायोजक म्हणून २०१७पासून पाच वर्षांसाठी करार होता आणि त्यासाठी विवो कंपनी दर वर्षी ४४० कोटी मोजत होती. हा करार यंदाच्या स्थगित झाल्याने बीसीसीआय आयपीएलसाठी नवीन प्रायोजकाच्या शोधात आहे आणि त्यांनी त्यासाठी नवीन कंपन्यांना निविदा सादर करण्याचे आवाहन केले होते आणि निविदांसाठी अर्ज सादर करण्याची काल शुक्रवार १४ ऑगस्ट ही अंंतिम तारीख होती. यासाठी बीसीसीआयने काही नियम आखून दिले असून वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीनेच प्रायोजकत्वासाठी अर्ज करावा अशी अट घालण्यात आली होती.

त्यानुसार शिक्षण क्षेत्राशी संबंधित ‘अनअकॅडेमी’, देशातील सर्वांत मोठ्या टाटा उद्योग समूहाच्या टाटा मोटर्स आणि फँटासी स्पोर्ट्‌स कंपनी असलेल्या ‘ड्रीम ११’ने काल शेवटच्या दिवशी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी दस्तावेज (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) बीसीसीआयकडे सादर केले आहेत. त्यामुळे या तीन कंपन्यात आता आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी संघर्ष असेल.