अदानीप्रकरणी काँग्रेसचा राजनभवनवर मोर्चा

0
2

>> अमित पाटकर, आलेमांव व पदाधिकाऱ्यांना अटक

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने दोनापावल येथील राजभवनावर केंद्र सरकार आणि उद्योगपती अदानीवरील कथित भ्रष्टाचारप्रकरणी मोर्चा काढून कारवाईची जोरदार मागणी केली. पोलिसांनी निदर्शने करणारे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्योगपती अदानीवरील कथित भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईसाठी आवाज उठविला. काँग्रेसचे कार्यकर्ते राजभवनाच्या प्रवेशद्वाराकडे जात असल्याने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या झटापट झाली. यात अमित पाटकर, युरी आलेमांव, सुनील कवठणकर व इतर किरकोळ जखमी झाले. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने कथित भ्रष्टाचार, फसवणूक आणि फसवणूक केल्याबद्दल अदानी यांना दोषी ठरवले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आगशी पोलीस स्थानकावर नेले.

21 रोजी आंदोलन करणार
गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, जमीन बळकाव, जमीन रूपांतर, सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक आदी विषयावरून येत्या 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आल्तिनो पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारी निवास स्थानाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा काल दिला आहे.