अतिरिक्त कोळसा हाताळणीस गोवा प्रदूषण मंडळाचा नकार

0
247

पावसाळा संपून कोरडे दिवस सुरू झाले असल्यामुळे साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला एमपीटीवर २.३ दशलक्ष मेट्रिक टन एवढा अतिरिक्त कोळसा हाताळू देण्यास गोवा राज्य प्रदूषण मंडळाने नकार दिला आहे. मान्सून काळातील चार महिन्यांत घालून दिलेल्या मर्यादेपर्यंत कोळसा हाताळणी झाली नव्हती. त्यामुळे आता अतिरिक्त कोळसा हाताळणीस परवानगी द्यावी अशी विनंती कंपनीने केली होती.

जून ते सप्टेंबर असे चार महिने कंपनीला प्रत्येकी ०.५९ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची हाताळणी करण्यास परवानगी दिली होती. परंतु पावसाळ्याच्या दिवसांत एमपीटीवर तेवढ्या कोळशाची हाताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे फरक भरून काढण्यासाठी अतिरिक्त कोळशाच्या हाताळणीस कंपनीने परवानगी मागितली होती.