अग्नि-१ची यशस्वी चाचणी

0
114

पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या अग्नि-१ या क्षेपणास्त्राची काल ओडिशातील व्हीलर बेटावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता ७०० किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती लष्कर संशोधन विकास संघटनेचे प्रवक्ते रवी कुमार गुप्ता यांनी दिली. संपूर्ण चाचणीचे आयोजन परिपूर्ण पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवरून जमिनीवर अचूकतेने मारा करण्याची या क्षेपणास्त्राची खासियत असल्याचेही ते म्हणाले. १२ टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची लांबी १५ मीटर आहे. याआधी १२ एप्रिल २०१४ रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.