अग्निशामक दलात पाणबुड्यांची भरती

0
9

अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा अंतर्गत राज्यात बुडण्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचावकार्यात मदत करण्यासाठी 2 ते 4 पाणबुड्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे दिली. अग्निशामक आणि आपत्कालीन विभागातर्फे 6 नवीन वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. अग्निशामक दलाकडे बुडणाऱ्या व्यक्तींचा शोध, मदतीसाठी पाणबुडे नाहीत. खासगी पाणबुड्यांना बोलावून घ्यावे लागतात. अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन दल आणखी मजबूत करण्याची गरज आहे. एफईएसअंतर्गत 2 ते 4 पाणबुड्यांची भरती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.