अखेर मिकी पाशेको यांचा गोवा सुराज पार्टीत प्रवेश

0
76

अखेर नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी गोवा सुराज पार्टीत प्रवेश केला असून पत्नी व्हियेला पाशेको यांच्याकडे या पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आहेत. काल आपल्या वाढदिवसाची संधी साधून गोवा सुराज पार्टीत प्रवेश केल्याचे मिकी यांनी जाहीर केले. आगामी विधानसभा निवडणूक नुवे मतदारसंघातून या पक्षाच्या तिकिटावर लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार मिकी पाशेको यांनी बेताळभाटी येथील आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यूजीडीपी पक्षात जाणार असल्याचे त्यांनी आधी जाहीर केले होते. त्याविषयी विचारले असता मिकी म्हणाले की, युगोडेपाकडून कोणतेच सकारात्मक उत्तर मिळाले नाही. शिवाय या पक्षाचे अध्यक्ष डॉ. जॉर्सन फर्नांडिस कुंकळ्‌ळी येथे आम आदमी पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे यूजीडीपीने आपशी जवळीक साधल्याचे दिसून येते. म्हणून गोवा सुराज पार्टी ही गोमंतकीयांची स्थानिक पार्टी आहे. गोव्याच्या हितासाठी पंधरा वर्षांपूर्वी ती स्थापन झाली होती असे पाशेको यांनी सांगितले.