Home बातम्या अंतर्गत लाथाळ्यांविषयी ‘आप’ पक्षातर्फे कबुली

अंतर्गत लाथाळ्यांविषयी ‘आप’ पक्षातर्फे कबुली

0

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून पक्षात अंतर्गत धुसङ्गूस सुरू झाली आहे. ‘आप’चे प्रवक्ते संजय सिंह यांनी काल दिल्लीमध्ये यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची कबुली दिली आहे. श्री. सिंह यांनी संयोजक पदावरून केजरीवाल यांना हटविण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याची स्पष्टोक्ती दिली. मात्र, या वादाच्या केंद्रस्थानी असणार्‍या योगेंद्र यादव यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगून पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आपचे पक्षांतर्गत लोकपाल ऍडमिरल रामदास ऍडमिरल रामदास यांनी केजरीवाल यांना पाठवलेले पत्र प्रसारमाध्यमांनी जाहीर केल्यानंतर पक्षाअंतर्गत लाथाळ्या चव्हाट्यावर आल्या होत्या. तसेच पक्षाचे एक प्रमुख नेते प्रशांत भूषण यांनीही एक पत्र पाठवून पक्षातील पारदर्शकता, तिकीट वाटपावेळचा सावळागोंधळ आणि अंतर्गत लोकशाही याविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते.