६ एअरबॅग सक्तीचा निर्णय लांबणीवर

0
5

कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल जाहीर केले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन निर्मिती क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आता १ ऑक्टोबर २०२३ पासून कारमध्ये सहा एअरबॅग लावण्यात येणार आहेत.