५८७ पैकी ३३२ उमेदवारी अर्ज वैध

0
20

गोवा विधानसभेच्या येत्या १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार्‍या ४० जागांच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या ५८७ उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर ३३२ अर्ज वैध ठरले असून २५५ अर्ज फेटाळण्यात आले. आज दि. ३१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सत्ताधारी भाजपने पहिल्यांदाच ४० मतदारसंघात उमेदवार उभे केले असून आपचे ३९ मतदारसंघात उमेदवार असून डिचोलीत अपक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीत कॉंग्रेसने ३७ तर गोवा फॉरवर्डचे ३ मतदारसंघांत उमेदवार आहेत. मगोप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या निवडणूकपूर्व आघाडीत मगोप १२ आणि तृणमूलचे २५ मतदारसंघात उमेदवार असून रेव्होलुशनरी गोवन्सचे ३८ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे २३ तर निवडणूक रिंगणात ८३ अपक्ष उमेदवार आहेत.