Home बातम्या हेल्मेट सक्तीसंदर्भात आमदारांना विश्‍वासात घेणार

हेल्मेट सक्तीसंदर्भात आमदारांना विश्‍वासात घेणार

0

दुचाकी स्वारामागे बसणार्‍यालाही (पिलियन रायडर) हेल्मेटची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआधी राज्यातील सर्व आमदारांना विश्‍वासात घेण्यात येणार असल्याची माहिती काल वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार गोव्यात पिलियन रायडरलाही हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील पायलट संघटनेतर्फेही या निर्णयाचा निषेध करण्यात आला होता.