हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर काश्मीरातील चकमकीत ठार

0
107

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिजबुल मुजाहिद्दीनने रियाजला कमांडर म्हणून नियुक्त केले होते.

भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणार्‍याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. जम्मू काश्मीरमध्ये काल बुधवारी सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. एका ठिकाणी भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. तर दुसरीकडे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज याला कंठस्नान घातले.