Home बातम्या सोन्या-चांदीच्या दरांत घसरण

सोन्या-चांदीच्या दरांत घसरण

0

जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर काल खुल्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. दहा ग्रॅम सोन्याचा दर रु. १५४०नी खाली येऊन रु. २५ हजार ८०० झाला. अन्य आशियाई व युरोपीय देशांतही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.

चांदीच्या किमतीतही रु. ३२०० एवढी घट होऊन किंमत रु. ५०८०० प्रति किलो इतकी झाली.

मुंबई बाजारात सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमची किंमत रु. १२७०ने कमी होऊन रु. २५५९० बनली. चांदी रु. ५५३५ नी स्वस्त होऊन प्रति किलो रु. ४८७४० झाली.

ग्रीक देशाच्या दिवाळखोरीच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बागारपेठेत गुंतवणुकदारांन रोकड जमविण्याची घाई निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री केली जात आहे. त्यामुळेच हे दर उतरल्याचा अंदाज आहे.

स्टँडर्ड सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम किमतीत रु. ६३५, चोख सोन्याच्या प्रति दहा ग्रम किमतीत रु. ६३० इतकी घसरण झाली.