वादळाने प्रभावीत भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून संपूर्ण परिसर वादळी वार्याच्या गर्तेत सापडला आहे. लाखो लोक विजेविना काळोखात असून न्यूयॉर्क शेअर बाजारही सलग दोन दिवस बंद ठेवावा लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ही ‘मोठी आपत्ती’ असल्याचे घोषित केले आहे.
या वादळाने न्यू जर्सी परिसरास ८० कि.मी. वेगाच्या वार्यांनिशी धडक दिली. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये १३ फुटांच्या समुद्री लाटा उसळत होत्या. या भागातच भारतीयांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. न्यू जर्सीमध्ये सध्या सर्वत्र पाणी भरलेले आहे. दरम्यान वादळामुळे अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची प्रचार मोहीमही थांबवावी लागली आहे. न्यू जर्सी, न्यू यॉर्क, मेरीलँड, उत्तर कोरोनीना, पश्चिमव्हर्जिनीया, पेन्सिल्वेनिया, कॅनडा या परिसरात वादळी मृत्यूंची नोंद झाली आहे. सुमारे २० लाख लोकांना घरे खाली करून अन्य सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.