साळेरी आगोंद तसेच काब-द-राम किनारी भागातील काही मच्छीमार होड्या व जास्त प्रमाणात मच्छीमार जाळी वाहून गेल्याच्या तक्रारी मच्छीमार खाते व पंचायत तलाठी यांच्याकडून नोंद करून घेण्यात आल्या आहेत. वादळी वार्यामुळे समुद्राचे पाणी अचानक वाढल्याने साळेरी खोला येथील मच्छीमार बांधवांनी आपल्या मच्छीमारी नौका धक्यावर बांधून ठेवण्यात यश मिळविले तरी मच्छीमारी जाळी वाचवण्यात अपयशी ठरल्याचे समाजकार्यकर्ते व मच्छीमार आनंदू पागी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
साळेरी-खोला येथे माजी मंत्री संजय बांदेकर यांच्या प्रयत्नातून मच्छीमार धक्का व जाळे विणण्यासाठी शेड बांधण्यात आली होती, मात्र या मच्छीमार शेडचा वापर काही होडी चालकांकडून आपल्या होड्या सुस्थितीत ठेवण्यासाठी वापर केल्याची माहिती मच्छीमार अधिकारी पुरुषोत्तम वेळगेकर यांनी दिली असून मच्छीमार जाळी विणण्यासाठी बांधलेल्या शेडचा वापर होड्या ठेवण्यासाठी करू नये असे आवाहन केले आहे.
होड्या ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला धक्का सध्या येथील होडीचालकांना अपुरा पडत असून रॅम्प विस्तारित करण्यासाठी आजूबाजूची सुमारे १७०० चौरस मीटर जागा आरक्षित केल्याची माहिती खोलाच्या उपसरपंच अस्मिता पागी यांनी दिली.
साळेरी खोला येथील मच्छीमार बांधवांना वादळी वार्याचा तडाखा बसलेल्या आपदग्रस्तात प्रतीक्षा पागी, सुमित्रा पागी, क्रांती पागी, आनंदु पागी, रामचंद्र पागी, राजन पागी, श्रीकांत के. पागी, नागेश के. पागी, धाकू एफ. पागी, खुशाली पागी, जयवंत एस. पागी, अनंत व्ही. पागी, दिलखूष पागी, विठोबा एस. पागी, गणेश वी. पागी, जानू हिरू पागी, चंद्रकांत के. पागी, अजय पागी, सुधाकर कुष्ट पागी, उल्हास के. पागी, आनंद आर. पागी, संतोष चंदू पागी, रंजन के. पागी, तुळशीदास बाबूसो पागी, भालचंद्र गणेश पागी, अनंत शिवा पागी, रमेश शिवा पागी, रुपा दिनेश पागी आदींचा समावेश आहे.