कंटेनर (जीए ०१ यू ११०४) साखळीहून डिचोलीमार्गे चालला होता तर टँकर (जीए ०१ व्ही ६४८१) हा डिचोलीहून होंडामार्गे चालला होता. यावेळी साकळी येथील राधाकृष्ण मंदिरासमोर या दोघांची टक्कर झाली.
त्यात कंटेनर रस्त्यावरच आडवा झाला. त्यामुळे हा मुख्य महामार्ग सुमारे तीन तास वाहतुकीसासाठी बंद झाला. दरम्यान गुरुवारी रात्री नावेलीत रस्त्यावर कंटेनर पडल्यामुळे साखळी आमोणा माशेलमार्गे पणजी, फोंडा, मडगाव, वास्को येथे जाणार्या कर्मचार्यांची मोठी गैरसोय झाली.