सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन यांना काल अंतरिम जामीन मंजूर केला. वैद्यकीय आधारावर त्यांना 6 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जैन हे मे 2022 पासून कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत.