यंदा जूनमध्ये देशात सामान्यपेक्षा कमी पाऊस

0
4

>> भारतीय हवामान खात्याचा अंदाज; पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याकडून नैऋत्य मान्सूनबाबत शुक्रवारी नवा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार, जूनमध्ये भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर जून ते सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनच्या आसपासच मान्सून केरळमध्ये दाखल होईल; पण 1 जूनआधी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.