गोवा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तसेच सर्वधर्म समभाव राखणारे भारतांतील एकमेव राज्य आहे. त्यासाठी भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अजब है गोवा के लोग’ म्हटले होते. आता याच गोव्यात धार्मिक कलह माजविणारी श्रीराम सेनेसारखी संस्था येत आहे. त्यावर गोवा सरकारने बंदी घालावी अशी मागणी आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.
कर्नाटकांतील प्रमोद मुतालिक यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामसेना गोव्यात उघडण्याच्या तयारीत असून त्यामुळे गोव्यात धार्मिक तेढ निर्माण होईल व त्याचा परिणाम पर्यटनावर होईल. कॉंग्रेस सरकारने २००९ साली या सेनेवर बंदी घातली होती पण भाजपा सरकार सौजन्यशिल वृत्तीने त्याकडे पहात आहे, असेही त्यांनी म्हटले. भाजपा सरकारने भातावर ७ ते १७ रुपयेपर्यंत आधारभूत किंमत देण्याचा निर्णय घेतला आहे हे नवीन काही नसून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारनेही हेच जाहीर केले होते, असेही यावेळी ते म्हणाले.