Home बातम्या ‘शेतकरी बाजार’साठी अधिकारी दौर्‍यावर

‘शेतकरी बाजार’साठी अधिकारी दौर्‍यावर

0

गोव्यातील शेती व भाजी उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने गंभीर पावले उचलली असून स्थानिक शेतकर्‍यांना रस्त्याच्या बाजूला बाजार कशा पध्दतीने उपलब्ध करून द्यावा, यावर अभ्यास करण्यासाठी कृषी संचालक सतिश तेंडुलकर व कृषी सचिव व अन्य संबंधित अधिकारी चेन्नईला रवाना झाले आहेत.

तामीळनाडू येथील सरकारने शेतकर्‍यांना ज्या पध्दतीने बाजार सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याच धर्तीवर गोव्यातील शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सरकारने तयारी ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्याची घोषणा केली होती. त्याचा भाग म्हणूनच वरील अधिकार्‍यांना चेन्नईच्या दौर्‍यावर पाठविण्यात आले आहेत.