‘शिवलिंग’ सापडलेल्या परिसराचे संरक्षण कायम

0
5

>> ज्ञानवापी वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या आतील भागाच्या संरक्षणाचा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. याच भागात सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडले होते. या भागाला पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी वादावर दाखल सर्व खटल्यांच्या एकत्रिकरणासंदर्भात वाराणसी न्यायालयात अर्ज करण्यास परवानगी दिली.

ज्ञानवापी मशिदीच्या संरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची मुदत १२ नोव्हेंबरला संपणार होती. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी न्यायालयाकडे केली होती. १७ मे रोजी या परिसराचे संरक्षण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर वाराणसी न्यायालयाने या परिसराच्या व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाला परवानगी दिली होती.