विहीरीत पडलेल्या एका जर्मन पर्यटकास म्हापसा अग्नीशामक दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
इवोहनिस अकोसीडीस (४३) हा जर्मन पर्यटक अंधारात पहाटे ३.१५ वा आपली मोटारसायकल शोधताना गुमालवाडो-हणजुण येथील कठडा नसलेल्या ४५ फूट खोल विहीरीत अंदाज न आल्याने तोल जाऊन पडला होता. त्याच्या सोबत असलेल्यांनी त्वरीत हणजुण पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी म्हापसा अग्नीशामक दलास पाचारण केले. म्हापसा अग्नीशामक दलाचे रत्नाकांत गावस, लाडू सावंत, विठ्ठल गांवकर, प्रविण गांवकर, नरेंद्र शेट्ये या जवानांनी अकोसिडीला सुखरुप विहीरीबाहेर काढून जीवदान दिले.