विरोधी पक्षांच्या १२६ आमदारांसह २७ खासदारांचे मुर्मू यांना मतदान

0
16

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जरी निश्चित होता, तरी त्यांना अपेक्षित मतांपेक्षा जास्त मते मिळाली. त्यामुळेच विरोधी पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी मुर्मू यांना मते दिल्याचे स्पष्ट झालं आहे. या संदर्भात विरोधी पक्षाच्या १२६ आमदारांनी व १७ खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेमध्ये एकूण ५३ मते ही बाद झाली होती.

द्रौपदी मुर्मू यांना संसदेत ५४० खासदारांनी तर देशातील २ हजार २८४ आमदारांनी मते दिली. या मतांचे एकूण मुल्य हे ६ लाख ७६ हजार ८०३ एवढे होते. तर विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांनी तर देशातील १६६९ आमदारांनी आपले मत दिले. या मतांचे एकूण मूल्य हे ३ लाख ८० हजार १७७ एवढे झाले.

दरम्यान, प्रत्यक्ष मतदान झालेल्या एकूण ४७०१ मतांपैकी दोन हजार ८२४ मते मुर्मू यांना मिळाली. ज्यांची टक्केवारी ६४.०३ एवढी होते. मुर्मू यांना ६० टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तर भाजपच्या काही नेत्यांनी ७० टक्के मते मिळतील असा दावा केला होता. मतमोजणीनंतर मुर्मू यांना ६४ टक्के मते मिळाली. त्यामुळे यात काही विरोधी पक्षाच्या आमदार व खासदारांनी त्यांना मतदान केल्याचे सिद्ध झाले.

गुजरातमध्ये विरोधी पक्षांतील १० आमदारांची मते फुटली. आसाममध्ये सर्वाधिक जास्त २२, उत्तर प्रदेशमध्ये १२ आणि गोव्यातील ४ विरोधी पक्षातील आमदारांनी मुर्मू यांच्या पारड्यात मते टाकली.