सरकार हतबल
गणेश चतुर्थीच्या काळात जनतेला चाळीस रुपये प्रतिलिटर दराने खुल्या बाजारात केरोसीन उपलब्ध केले होते. परंतु ९० टक्के केरोसीन वितरकांनी ते उचललेच नाही, त्यामुळे आता नाताळ किंवा दिवाळीच्या वेळी केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत काय करावे, हा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरी पुरवठा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
गॅस जोडण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्य सरकारला काहीही कळविलेले नाही, पेट्रोलियम कंपन्याच सर्वकाही करीत असल्याचे मांद्रेकर म्हणाले.