दक्षिण गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे मिनीनो जिझसच्या कोलवा फामानिमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी संध्या. ८ वाजल्यापासून ते १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत कोलवा चर्च येथील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे कुडचडे मतदारसंघातील शेल्डे ग्रामपंचायतीतील निर्मलनगर शेल्डे ते सकलोवाडो-वयलोवाडो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश न्यायदंडाधिकार्यांनी दिले आहेत.