वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

0
9

सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षलवाद प्रकरणातील संशयित ८४ वर्षीय वरवरा राव यांना काल जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव राव यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपांनंतर वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती. वरवरा राव यांचे वय, ढासळलेले आरोग्य आणि तुरुंगात आत्तापर्यंत घालवलेला अडीच वर्षांचा कालावधी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.