Home बातम्या लोकशाहीत सुधारणा आणताना स्तंभ ढासळू देऊ नका : राष्ट्रपती

लोकशाहीत सुधारणा आणताना स्तंभ ढासळू देऊ नका : राष्ट्रपती

0

लोकशाहीमध्ये कोणत्याही सुधारणा आणताना त्यामुळे लोकशाहीचे स्तंभ असलेल्या संस्था ढासळणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काल ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात ‘लोकपाल’च्या संदर्भात केले. ‘‘झाडाला लागलेले वाईट फळ काढण्याच्या नादात झाड हलवीत असताना ते झाडच खाली येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल’’ असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या भाषणात अण्णा हजारे यांच्या चळवळीचा उल्लेख केला नाही, परंतु त्यांचा रोख त्यांच्या दिशेनेच होता. आपल्या देशात केवळ आर्थिक सुबत्ता येणे पुरेसे नसून ज्या देशात समानता आणि न्याय आहे, असा देश आपल्याला हवा आहे. लोकशाही, कायदा सुव्यवस्था, मानवी मूल्ये या सर्व घटकांची आपल्या देशाच्या मजबुतीसाठी आवश्यकता आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.