रेल्वे कामगारांना मारहाण;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
9

वेळसाव येथे रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबीचे नुकसान केल्याबद्दल आणि दगडफेक करून रेल्वे कामगारांना मारहाण केल्याबद्दल वास्को रेल्वे पोलिसांनी चौघां जणांविरुद्ध काल गुन्हा नोंदवला. ओलेन्सियो सिमॉईस, ऑर्विल दोरादो, फ्रान्सिस ब्रागांझा आणि कामिलो डिसोझा यांच्याविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 324, 427 आणि 149 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वास्को रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सामाजिक कार्यकर्ते ओलेन्सियो सिमॉईस, ऑर्विल दोरादो, फ्रान्सिस ब्रागांझा, कामिलो डिसोझा आणि इतर 10 जणांनी कनई सरदार आणि रामेश्वर सरदार (दोघेही सूर्या कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार) यांच्यावर हल्ला केला होता. तसेच त्यांनी रेल्वे विकास निगमच्या कामासाठी वापरत असलेल्या जेसीबी वाहनाचेही दगडफेक करून नुकसान केले होते. त्यात अंदाजे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनी काल सदर संशयितांविरुद्ध काल गुन्हा नोंदवला.