राज्यात दोन रुग्णांना ‘एच3एन2’चा संसर्ग

0
4

ाज्यात एच3एन2 विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले असून, नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. राज्यात आढळून आलेल्या एच3एन2 विषाणू बाधित दोन रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत सदर रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मागील चोवीस तासांत नवीन 17 कोरोना रुग्ण आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 109 एवढी झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत आणखीन 170 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 10 टक्के एवढे आहे. तसेच चोवीस तासांत 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य खात्याने नागरिकांना कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, शालेय मुलांना अस्वस्थ वाटू लागल्यास घरी ठेवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असलेल्या नागरिकांनी गरज भासल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.