Home बातम्या ‘राष्ट्रवादी’ला रालोआत प्रवेश नाही : शिवसेना

‘राष्ट्रवादी’ला रालोआत प्रवेश नाही : शिवसेना

0
शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे काल शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या वृत्ताबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्याशी भेट झाली नसल्याचे सांगताना वरील वृत्त निराधार असल्याचे सांगितले.