Home बातम्या राय दरोडा प्रकरणी १० जणांविरुद्ध आरोपपत्र

राय दरोडा प्रकरणी १० जणांविरुद्ध आरोपपत्र

0

दोन वर्षामागे राय येथील मारिया फर्नांडिस हिच्या घरावर दरोडा घालून दागिने व रोख रक्कम पळविल्या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी दोन सराफांसह १० जणांवर कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.

राजू देवर (आझाद नगरी, मडगाव), मायकल फर्नांडिस, अशीफ कित्तूर, जेनसन वर्गीस, व्हेली डिकॉस्ता, नरेंद्र पाटील, मेहबूब साब गांजल, बाशा पुजारी या आठजणांना दरोडा प्रकरणी व ते दागिने घेतल्याच्या आरोपावरून अशोक कोलवेकर व नागराज कलागूर यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. मेहबूब साब गांजल व बाशा पुजारी फरारी आहेत. तर व्हेली डिकॉस्ता न्यायालयीन कोठडीत आहे. मायकल फर्नांडिस आणखी एका प्रकरणात सडा येथील कोठडीत होता. तेथून तो पळून गेला. इतरांची जामिनावर सुटका झाली. पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी १५० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात १५ साक्षीदार आहेत. ही घटना २२ जुलै २००९ साली रात्री ७.३० वाजता घडली होती. मारिया फर्नांडिस हिच्या घरात बळजबरीने घुसून पिस्तुलाचा धाक दाखविला व एका खोलीत बांधून बंद केले. त्यानंतर दागिने व रोख रक्कम लुटली होती.