मुख्यमंत्री पर्रीकर यांची स्पष्टोक्ती
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा अशी जी मागणी मराठीप्रेमींकडून होऊ लागली आहे त्यासंबंधी विचारले असता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की राजभाषा कायद्याची बर्याच पूर्वी स्थापना झालेली असून आता त्याबाबत फेरविचार करण्याची कोणतीही गरज नाही.
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून लीना मेहेंदळे यांचा शपथविधी झाल्यानंतर पर्रीकर यांना पत्रकारांनी या अनुषंगाने प्रश्न विचारला होता.
राज्य माहिती आयुक्तांची पदे भरण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
राज्य माहिती आयुक्ताचे दुसरे पद तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सरकारने राज्य माहिती आयुक्ताचे एकच पद तयार केले होते. आता दुसरे पद तयार करण्यात येईल. मुख्य माहिती आयुक्त लिना मेहेंदळे यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्य माहिती आयुक्तांचे कार्यालय सध्याच्या पाटो येथून रायबंदर येथील गोवा मॅनेजमेंट विद्यालयाच्या इमारतीत हलवण्यात येईल. मात्र, त्यासाठी दोन महिन्यांच्या अवधी लागणार असल्याचे ते म्हणाले.