म्हापसा बाजारपेठेत असलेल्या सुरेश म्युझिकल या सीडी विक्री करणार्या एका दुकानावर छापा टाकत म्हापसा पोलिसांनी सुमारे सात लाख रुपये किमतीच्या पाच हजार बनावट सीडी जप्त केल्या. या प्रकरणी सुरेश मोरजकर या संशयितास अटक केली आहे. फ्रान्सिस्को झेवियर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
म्हापशाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक म्युझिक स्टोअर्सद्वारे गोमंतकातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना एकत्र करत काही तियात्रांच्या तसेच नाटकांच्या सीडी तयार केल्या होत्या. सदर सीडी संशयित मोरजकर हा कॉपी करून बनावट रुपाने विक्री करत असल्याची तक्रार श्री. झेवियर यांनी पोलिसांत केली होती. त्यानुसार म्हापसा पोलिसांनी कारवाई केली.