Home बातम्या मोरजीत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

मोरजीत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

0

स्थानिक युवकाला अटक

अमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलिसांनी सोमवारी बागवाडा-मोरजी येथे छापा मारून अब्रावानेल पाझ (२५) या मोरजी येथील युवकाकडून ५८ लाख रु. चे अमली पदार्थ व २० हजार रु. रोख जप्त केले.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांत ७.२ ग्रम एलएसडी, १०५.५ ग्राम एमडीएमए व १० ग्राम एलएसडी यांचा समावेश असल्याचे अमली पदार्थ विरोधी विभागातील पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी २४ रोजी ७ ते ११ (रात्री) यावेळी वरील छापा मारला. पोलीस उपनिरीक्षक थेरॉन डिकॉस्टा यांनी फौजफाट्यासह हा छापा मारला.