मोप मनोहर विमानतळावर 1 लाख प्रवाशांची हाताळणी

0
10

गेल्या 5 जानेवारी रोजी सुरू झालेल्या मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा केलेल्या विमानांतून अवघ्या 20 दिवसांत 1 लाख एवढ्या प्रवाशांची संख्या पूर्ण झाली असल्याची माहिती काल जीएमआर कंपनीने दिली. गेल्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले होते, तर 5 जानेवारीपासून या विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली होती. अवघ्या 20 दिवसांच्या काळात या विमानतळावरुन 1 लाख एवढ्या प्रवाशांची ये-जा झाली.