Home बातम्या मोदींची सभा घेणे शोभत नाही : कॉंग्रेस

मोदींची सभा घेणे शोभत नाही : कॉंग्रेस

0
काणकोण येथे इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडलेली असताना राज्यान नरेंद्र मोदींची जाहीर सभा घेणे हे शोभादायक नसल्याचे काल कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

दोन-अडीच वर्षांपूर्वी कालवी येथे नदीत बस पडून शाळकरी मुले बुडून ठार झाली होती तेव्हा कॉंग्रेसने पणजीतील कार्निव्हल महोत्सव रद्द केला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली सापडलेल्या कामगारांपैकी काही जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना ही जाहीर सभा होते आहे हे खेदजनक असल्याचे देशप्रभू म्हणाले.
 शेतकर्‍यांची परवानगी न घेता मेरशी येथील शेतजमीन मोदींच्या जाहीर सभेसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही देशप्रभू यांनी केला.