Home बातम्या मुख्यमंत्र्यांची आज दाबोळी विमानतळास भेट

मुख्यमंत्र्यांची आज दाबोळी विमानतळास भेट

0

या विमानतळावर प्रवाशांची व विमानांची गर्दी वाढली असून अनेकदा पर्यटकांना घेऊन येणारे विमान तेथे उतरविणे शक्य नसते. पार्किंग सुविधा नसल्याने दाबोळीला आलेले विमान मुंबईला न्यावे लागते.

मोप विमातळ झाला तरी दाबोळी विमानतळाचे महत्त्व कमी करणे शक्य नाही. त्यामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा तयार करण्यावर आपण भर देणार असल्याचे पर्रीकर यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

मोप विमानतळ झाल्यास दाबोळी बंद होईल : देशप्रभू

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक आश्‍वासने दिली होती. परंतु त्याची पूर्तता करण्याच्या बाबतीत ते आता जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप करून मोप विमानतळ चालू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होईल. त्यामुळे सरकारने दाबोळी चालू ठेवण्यासाठी केंद्राबरोबर करार करावा, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

आयकाव या कंपनीने दिलेल्या अहवालात मोप व दाबोळी हे दोन्ही विमानतळ चालू ठेवणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे. आपण मोप विमानतळ व्हावा म्हणून पूर्वीपासून प्रयत्न करीत होतो. परंतु पेडणे भागातील लोकांचा त्यास विरोध आहे, त्यामुळे २००७ च्या निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण माध्यमाच्या प्रश्‍नावर भाजप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु डायोसेसन व अन्य शाळांचे अनुदान वितरित करण्याचे टाळले आहे. कुठ्ठाळी निवडणुकीपूर्वी ताबडतोब अनुदान वितरीत करण्याची मागणी देशप्रभू यांनी केली. माध्यम प्रश्‍नावर भाजप सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोपही त्यांनी केला. २ जून रोजी होणार्‍या कुठ्ठाळी पोटनिवडणुकीत दाबोळी विमानतळ व शिक्षण माध्यम प्रश्‍न महत्त्वाचे ठरतील, असेही त्यांनी सांगितले.