26.2 C
Panjim
Sunday, July 25, 2021

मुंबईचा सलग पाचवा विजय

>> क्विंटन डी कॉकचे दमदार अर्धशतक, राहुल चहरचा प्रभावी मारा

रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी दिलेल्या ९४ धावांच्या खणखणीत सलामीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने काल शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी व १९ चेंडू राखून दारुण पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमात मिळविलेला मुंबइईचा हा सलग पाचवा व एकूण सहावा विजय ठरला. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकून सरस निव्वळ धावगतीच्या जोरावर १२ गुणांसह पुन्हा अव्वल स्थान मिळविले. कोलकाताने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे किरकोळ आव्हान मुंबईने १७.५ षटकांत केवळ २ गडी गमावून गाठले. केवळ ४४ चेंडूंत नाबाद ७८ धावा चोपलेला यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला.

तत्पूर्वी, दिनेश कार्तिक याने कर्णधारपद सोडल्यामुळे कर्णधारपदाची माळ गळ्यात पडलेल्या ऑईन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बँटनला वगळल्यामुळे राहुल त्रिपाठी व शुभमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. परंतु, त्रिपाठी याने ‘पॉईंट’वर असलेल्या सूर्यकुमारकडे झेल दिल्याने कोलकाताला चांगल्या सलामीला मुकावे लागले. त्रिपाठी बाद झाल्यानंतर कोलकाताची मधली फळीदेखील कोलमडली. मुंबईने नितीश राणा याचा कमकुवत दुवा हेरून ‘शॉर्ट बॉल’चा खुबीने वापर केला. कुल्टर नाईलचा एक असाच शरीरवेधी चेंडू लेगसाईडला तटावण्याच्या नादात राणा यष्टिरक्षक डी कॉककडे झेल देत परतला. कर्णधारपदाचा भार कमी झाल्यामुळे कार्तिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, आरबीसीविरुद्ध चहलच्या गोलंदाजीवर कार्तिक जसा बाद झाला होता तसाच कालही झाला. राहुल चहरचा एक बाहेर जाणारा चेंडू कार्तिकने यष्ट्यांवर ओढवून घेतला. आंद्रे रसेल याच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. जसप्रीत बुमराहने त्याला स्वस्तात तंबूची वाट दाखवली. मॉर्गन व पॅट कमिन्स यांनी सहाव्या गड्यासाठी ९.२ षटकांत ८७ धावांची भागीदारी केली. यात कमिन्सने ३६ चेंडूंत ५३ तर मॉर्गनने २० चेंडूंत ३२ धावांचे योगदान दिले.

कोलकाताने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना टॉम बँटन व कमलेश नागरकोटी यांना वगळून अष्टपैलू ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांचा संघात समावेश केला. दुसरीकडे मुंबईने जेम्स पॅटिन्सनला विश्रांती देताना नॅथन कुल्टर नाईलला मोसमातील पहिलाच सामना खेळण्याची संधी दिली.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः राहुल त्रिपाठी झे. यादव गो. बोल्ट ७, शुभमन गिल झे. पोलार्ड गो. चहर २१, नितीश राणा झे. डी कॉक गो. कुल्टर नाईल ५, दिनेश कार्तिक त्रि. गो. चहर ४, ऑईन मॉर्गन नाबाद ३९, आंद्रे रसेल झे. डी कॉक गो. बुमराह १२, पॅट कमिन्स नाबाद ५३ (३६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), अवांतर ७, एकूण २० षटकांत ५ बाद १४८
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-३२-१, नॅथन कुल्टर नाईल ४-०-५१-१, जसप्रीत बुमराह ४-०-२२-१, कृणाल पंड्या ४-०-२३-०, राहुल चहर ४-०-१८-२
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. कार्तिक गो. मावी ३५, क्विंटन डी कॉक नाबाद ७८ (४४ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार), सूर्यकुमार यादव त्रि. गो. वरुण १०, हार्दिक पंड्या नाबाद २१, अवांतर ५, एकूण १६.५ षटकांत २ बाद १४९
गोलंदाजी ः ख्रिस ग्रीन २.५-०-२४-०, पॅट कमिन्स ३-०-२८-०, प्रसिद्ध कृष्णा २-०-३०-०, आंद्रे रसेल २-०-१५-०, वरुण चक्रवर्ती ४-०-२३-१, शिवम मावी ३-०-२४-१

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

ALSO IN THIS SECTION

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

२० रेल्वेगाड्या रद्द

मुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...