Home बातम्या मालीम खून प्रकरणी ४८ तासांत आरोपी गजांआड

मालीम खून प्रकरणी ४८ तासांत आरोपी गजांआड

0

मालीम, बेती येथे खून झालेल्या अब्दुल रहमान (३२) याच्या खूनप्रकरणी संशयित खूनी अवघ्या ४८ तासात जेरबंद करण्यात पर्वरी पोलिसांना यश आले.

दि. २९ रोजी अब्दुल यास बाचाबाचीतून चंद्रू अण्णामलाई (२८) मूळ तामिळनाडू याने जबर मारहाण केली असा आरोप आहे. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. दि. ३१ रोजी त्याचे निधन झाले.

शवचिकित्सा अहवालानंतर सदर खुनाचा प्रकार असल्याचे निदान करण्यात आले होते. निरिक्षक मनोज म्हार्दोळकर, उपअधिक्षक पंढरीनाथ मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सगुण सावंत, शिपाई – महादेव आणि साथीदारासह एकूण १८ जणांना याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर चंद्रू यास ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून दारूच्या नशेत आपल्या हातून हे कृत्य घडल्याचे त्याने सांगितले.

काल आरोपीस न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांच्या रिमांडवर पाठविण्यात आले.