Home बातम्या माध्यमप्रश्‍नी आजपासून युवकांचे आंदोलन

माध्यमप्रश्‍नी आजपासून युवकांचे आंदोलन

0

आज सोमवार दि. १८ जून रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आज सकाळी प्रथम फोंडा येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याजवळ गार्‍हाणे घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तद्नंतर क्रांती मैदानावर मूक मोर्चा नेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मात्र, क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार असलेल्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणण्यात येणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने राज्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘दिगंबर कामत गेल वेल सून’ या नावाने महाविद्यालयीन युवक-युवतींनी वरील संघटना स्थापन करून राज्यात आंदोलन सुरू केले होते. आता पर्रीकर सरकारने माध्यम बदललेल्या १२६ शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याच्या पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे.