Home बातम्या महाभारत आणि अणुयुद्ध

महाभारत आणि अणुयुद्ध

0

रुद्राजी जगन्नाथ शे. केंकरे

भारत सरकारने अलीकडेच अमेरिकेबरोबर अणुकरार केला असून परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी भारत सरकारच्या वतीने स्वाक्षरी करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या अणुकराराची मूळ संकल्पना पूर्व पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांची होती. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत आणि तद्नंतर भाजपच्या कारकिर्दीत जे अणुस्फोट करण्यात आले, त्यामुळे जागतिक संघटनांनी धास्ती घेऊन अणुबॉम्ब बनविण्यास लागणारा अतिमहत्त्वाचा युरेनिअम धातू, त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची अशी तांत्रिक उपकरणे भारतात उपलब्ध होऊ नयेत म्हणून कोणत्याही देशाने हे अतिशय महत्त्वाचे घटक भारतास देऊ नयेत अशा प्रकारची जागतिक बंदी घातली.

भारतात युरेनिअमच्या खाणी आहेत, पण या खाणींतून मिळणारे युरेनिअम आपल्या एकूण गरजेच्या चतुर्थांशाएवढेसुद्धा नाही. याच युरेनिअमचा वापर करून वीज निर्माण करणारी भारतात १६ वीज केंद्रे आहेत. यांपैकी काही बंद पडण्याच्या मार्गावर असून पुरेशा युरेनिअमअभावी नजीकच्या काळात ती पूर्णपणे बंद होणार अशा पार्श्‍वभूमीवर हा करार करण्यात आलेला आहे. खुद्द अमेरिकेनेच आपल्या वर्चस्वाचा वापर करून घातलेली बंदी त्यांच्याच हातांनी उठविली हे बरे झाले. बिकट परिस्थितीतून निभावण्याचा एकमेव मार्ग म्हणून भारताने अमेरिकेशी हा करार केला. या करारामुळे भारताला कोठल्याही राष्ट्राकडून युरेनिअम खरेदी करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि अशा प्रकारे भारताचा मुख्य हेतू साध्य झालेला आहे.

अणुस्फोट करण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध डॉ. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी लावला आणि १९४० ते १९४४ च्या दरम्यान अमेरिकेतील न्यू मेक्सिको या राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली अणुबॉम्बचे अनेक चाचणी स्फोट केले गेले. असेच दोन अणुबॉम्ब जपानवर टाकून अमेरिकेने दुसरे महायुद्ध आटोक्यात आणले हे जगजाहीर आहे. तद्नंतर पाचसहा वर्षांनी रोचेष्टर युनिव्हर्सिटीच्या एका जाहीर मेळाव्यात बोलताना डॉ. ओपेनहायमर यांनी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नाला चमत्कारिक उत्तर दिले होते.

प्रश्‍न : मॅनहॅटन येथे जो प्रयोगात्मक अणुस्फोट करण्यात आला तो स्फोट अशा प्रकारचा पहिलाच होता काय?

या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. ओपेनहायमर म्हणाले ः हो, जरूरसध्याच्या नव्या युगात पहिलाच.

याचा सरळ अर्थ असा की, सध्याच्या नव्या युगात घडलेला हा पहिला अणुस्फोट आहे. या उत्तरावर भाष्य करण्याची गरज नाही इतके ते स्पष्ट उत्तर आहे. उपस्थित थोडेसे गोंधळून गेले खरे.

आपल्या महाभारतात व रामायणात बर्‍याच ठिकाणी ब्रह्मास्त्राचा उल्लेख आहे. पुर्‍या ब्रह्माचे शक्तिबळ असलेले क्षेपणास्त्र या शब्दांनी उल्लेख केलेला आढळतो. ज्याज्या ठिकाणी या अस्त्राचा उल्लेख आहे, तिथेतिथे खालील शब्दांनी विस्तार केलेला आढळतो.

) एक जळता अग्निलोळ आणि धुराचा लोळ.

) दहा हजार सूर्य तेजाचे भयानक अस्त्र.

) अज्ञात आणि विजेपेक्षाही महाभयंकर अस्त्र.

) प्रत्यक्ष मृत्यूसमान, सर्वकाही राख करून सोडणारे अस्त्र.

) मनुष्य देह एवढे जळून गेले होते की त्यांची ओळखसुद्धा पटत नव्हती.

) एक संपूर्ण पिढीच नष्ट करू शकणारे महाभयानक अस्त्र.

) दूर असलेल्या लोकांची नखे आणि केस गळून पडले. भांडीकुंडी अकारण मोडून फुटून तुकडे तुकडे झाली.

) पक्षी जळून गेले तर इतर काही पांढरेशुभ्र झाले.

) काही घटिकांनंतर अन्न आणि खाद्यपदार्थ कुजून गेले.

१०) या प्रचंड आगीच्या डोंबातून स्वतःला वाचविण्यासाठी सैनिकांनी नदीत झोकून घेतले.

अशा शब्दांनी केलेली वर्णने महाभारतात आढळतात. ती वाचून, ही वर्णने अणुस्फोटाशी संबंधित आहेत याबाबत जराही संदेह नाही. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर १९४४ मध्ये टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बची वर्णने याच प्रकारची होती याची वाचकांना आठवण असावी.

महाभारताच्या अखेरच्या काळात शल्व आणि श्रीकृष्ण यांच्यातल्या युद्धाचा वृत्तांत आहे. हा शल्व श्रीकृष्णाचा शत्रू असावा. ‘सौभानावाच्या विमानातून त्याने द्वारकेवर हल्ला केला. हे अतिप्रचंड विमान त्यास माया दानव नावाच्या इंजिनिअरने खास बनवून दिले होते. हा माया दानव माया संस्कृतीच्या देशातून आला असावा. कारण या माया संस्कृतीच्या देशात विमानतळ होते. त्याची छायाचित्रे व्हॉन डेनिकेन नावाच्या संशोधकाने प्रसिद्ध केली आहेत. पांडवांची मयसभा अशाच एका माया इंजिनिअरने बांधली होती. रावणाचे पुष्पक विमान अशाच माया इंजिनिअरने बांधले. या माया संस्कृतीबाबत बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.

शल्व आणि श्रीकृष्ण लढाई महाभारतात अखेरची ठरली. हे सौभाविमान कोठल्याही भूमीवर, आकाशात अथवा समुद्रावर स्थिर होऊन भूतलावर हल्ला करून सैन्यदले, शहरे अथवा लोकसंख्येने गजबजलेले विभाग नष्ट करून टाकू शकत होते. मोठ्या प्रमाणात अस्त्रे, स्फोटकांचा साठा आणि सैन्यदल नेऊ शकणारे हे खास विमान होते.

श्रीकृष्णाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास– ‘‘हे विमान अत्याधुनिक आणि भयंकर अशा अस्त्रांनी भरलेले असावे. शल्वाचे सौभाविमान काही मैलांच्या उंचीवर आकाशात स्थिर राहून माझ्या सैनिकांवर वेगवेगळ्या अस्त्रांचा एकसारखा मारा करीत होते. यामध्ये क्षेपणास्त्रे, अग्निबाण, भाले, त्रिधारी भाले, अग्नी ओकणारे बाण न थांबता एकसारखा मारा करीत होते. आकाशात शंभर सूर्य तळपत असावे असे भासत होते. दिवस आणि रात्र यांचे अनुमान काढणे अशक्य व्हावे एवढ्या स्फोटक अस्त्रांचा मारा चाललेला होता.’’

सौभाविमान खरोखरच विस्मयकारक होते. या विमानाबद्दल आणि श्रीकृष्णशल्व लढाईबाबत भरपूर लिखाण अमेरिकेत वाचण्यास उपलब्ध आहे, आणि हे सर्व तिकडच्या लेखकांनी लिहिले आहे. आकाशात शेकडो विमाने उडत असल्याचा आभास ते निर्माण करू शकत होते. कित्येकदा हे विमान दृष्टिपथात येत असे, तर कधी आकाशात उभे असूनसुद्धा दृष्टिपथात येत नसे. अशामुळे यादव योध्ये पूर्णपणे गोंधळून गेले. कधी जमिनीवर तर कधी आकाशात, कधी टेकडीवर तर कधी नदीच्या पात्रातअशा मायावी दर्शनाने श्रीकृष्णाची सेना पूर्णपणे गोंधळून गेली. असा वृत्तांत भक्तिवेदात स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्णाया ग्रंथात आढळतो. अखेरीस श्रीकृष्णाने अपींळलरश्रश्रळीींळल ाळीीळश्रश सारखी क्षेपणास्त्रे वापरून शल्वाचा यशस्वी प्रतिकार केला. स्मार्ट बॉम्बसारख्या अस्त्रांचा वापर करून सौभा विमानाचे दोन तुकडे केले. त्यात शल्व आणि त्याची सेना नष्ट पावली, आणि त्याबरोबर महाभारताचाही अंत झाला.

अशा महाभयंकर अस्त्रांचा उपयोग केल्याने श्रीकृष्णाची द्वारका जवळजवळ नष्ट झाली असावी काय, असा संशय येतो. ही द्वारका सिंधूसरस्वतीच्या खोर्‍यात वाढलेली एक अत्यंत जुनी संस्कृृती होती; ज्यामध्ये द्वारकाच नव्हे तर हराप्पा, मोहेंजोदारोसारखी प्रचंड शहरे होती आणि ६००० वर्षांपूर्वी ही संस्कृती भरभराटीच्या शिखरावर पोचली होती, याचा न्यूयॉर्क टाइम्सने निर्वाळा दिलेला आहे. अण्वस्त्रे वापरून केलेल्या लढाईची झळ या पुर्‍या संस्कृतीला लागलीच असावी.

.. १९७९ मध्ये डेव्हिड दावेनपोर्ट नावाचा एक ब्रिटिश, पण भारतात जन्मलेलावाढलेला संशोधक. याने ख्रि. पू. २००० साली घडलेला अणुस्फोटया नावाचे एक संशोधनात्मक पुस्तक लिहून या विषयावर बराच प्रकाश पाडलेला आहे. दावेनपोर्टच्या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की सिंधूसरस्वती नद्यांच्या मध्ये बहरलेली सिंधूसरस्वतीसंस्कृती अणुस्फोटामुळे नष्ट पावली. दावेनपोर्ट म्हणतो की, मोहेंजोदारो हे या संस्कृतीमधले अतिप्राचीन शहर अणुस्फोटामुळे नष्ट पावले. या शहरात मृत्यूचा आखाडाया नावाने ओळखण्यात येणारे एक स्थळ हे नैसर्गिकरीत्या भग्नावस्थेत सापडलेले स्थळ नव्हे. प्राचीन इतिहास सांगतो की, मोहेंजोदारो हे ५००० वर्षे जुने शहर सिंधू नदीच्या पात्रात असलेल्या दोन जुळ्या बेटांवर वसलेले होते. याठिकाणी दोन किलोमीटर रुंद वर्तुळाकार भागात तीन वेगवेगळ्या प्रकारची नष्ट पावलेली भूमी आढळते. या वर्तुळाकार भूमीचा मध्यभाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. तद्नंतर दुसर्‍या वर्तुळाकार भागात मातीचे काळ्या दगडांत रूपांतर झालेले आहे. हे काळे दगड म्हणजे भांडीकुंडी वितळून त्यांचे दगडांत रूपांतर झालेले आहे असे दावेनपोर्ट म्हणतो. अशा प्रकारचे परिवर्तन ज्वालामुखी प्रज्वलित झाल्यावर आढळते, परंतु या ठिकाणी ज्वालामुखी शांत झाल्यावर आढळणारी राख सापडलेली नाही. एखादा धूमकेतू येऊन या ठिकाणी आदळला असे म्हणावे तर तत्कालीन अन्य कोणत्याही प्राचीन ग्रंथसामग्रीत धूमकेतूचा उल्लेख आढळत नाही.

संशोधकांच्या मते २००० अंश सेंटिग्रेड एवढ्या प्रचंड उष्णतेमुळे चिनी मातीची भांडी वितळून दगडात रूपांतर झाली. दावेनपोर्ट पुढे म्हणतो की, मोहेंजोदारोच्या अनेक ठिकाणी मरण पावलेल्या कुटुंबांचे सापळे (अस्थी) सापडल्या आहेत, ज्यांत एकमेकांचे हात घट्ट धरलेले स्पष्ट नजरेस आलेले आहे. त्यावरून कसला तरी महाभयंकर प्रकोप पाहत असताना या लोकांना मरण आले असावे. (पहा– ‘ईंेाळल वर्शीींीीलींळेप ळप २००० लललू ऊर्रींळव थ. ऊर्रींशपिेीीं) या अस्थींवरील ठशवळे अलींर्ळींळींू तपासून पाहता साधारणपणे नेहमी आढळणार्‍या ठशवळे अलींर्ळींळींू पेक्षा निदान ५० पटीने जास्त आढळली हे अतिशय विस्मयकारक आहे. दावेनपोर्टची संकल्पना क्षणभर नाकारली तरी अणुस्फोटाशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. याचवेळी सरस्वती नदीचे पात्र भंगले आणि ती आटली, एवढा महाप्रचंड स्फोट या ठिकाणी घडला असावा. बारा वर्षांचा दुष्काळही याचवेळी पडला होता असे महाभारतात लिहिलेले आहे. सरस्वती नदीच्या किनार्‍यावर वस्ती करून असलेले सारस्वत सैरावैरा पळू लागले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर अणुस्फोटाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

या ठिकाणी आणखी संशोधन झाले पाहिजे. तज्ज्ञमंडळीकडून संशोधन करून काही किरणोत्सर्गी रजोगण मिळतात की काय याचेही संशोधन करावे लागेल. शल्वाने टाकलेल्या अण्वस्त्रांनी मोहेंजोदारो आणि द्वारका नष्ट झाली काय याचाही शोध लागला पाहिजे. श्रीकृष्णाच्या महापरिनिर्वाणानंतर सिंधू संस्कृती नष्ट पावली, सरस्वती नदी आटली आणि या ठिकाणी वाळवंटास सुरुवात झाली हे सर्व विचारात घ्यावे लागेल. श्रीमती इंदिरा गांधी आणि श्री. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत याच ठिकाणी अणुस्फोट करण्यात आले हासुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल.

या शल्वाचा महाभारतात अन्य कोठेही उल्लेख नाही. त्याचे आणि श्रीकृष्णाचे वितुष्ट का असावे याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. हा अतिआक्रमक लढवय्या असावा. सौभा नावाचे अतिप्रचंड विमान व भयानक अण्वस्त्रे त्याच्याकडे भरपूर होती तरीसुद्धा महाभारतात उल्लेख नसावा हे आश्‍चर्यजनक आहे. यात संशोधन व्हावे. कारण अशा प्रकारची विमाने अथवा याने अजूनही परलोकांतून भूतलावर येत आहेत, त्यांना उडत्या तबकड्या म्हणून संबोधित केले जाते. गेल्या ५० वर्षांत जगभर असल्या तबकड्या दिसल्या असून अदृश्य होण्यासारखे प्रकार यांच्याकडूनही घडत आहेत आणि जगभर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. ही विमाने कोठून येतात, काय उद्देश याबाबत बरेच साहित्य अमेरिकेत उपलब्ध आहे. अश्रळशप खवशपींळींळशी नावाचे एक पुस्तक कोणी थॉमसन नावाच्या संशोधकाने लिहिलेले आहे. त्यात शल्वाच्या द्वारकेवरील हल्ल्याचा उल्लेख आहे. या ग्रंथाचा परिणाम म्हणून सुमारे ३००० लष्करी अधिकारी आणि संशोधकांनी याबाबतची माहिती उपलब्ध करावी असा अमेरिकन सरकारकडे आग्रह धरलेला आहे. भूतलावर अकस्मात अण्वस्त्रांचा हल्ला होऊ नये म्हणून सावध राहणे अगत्याचे आहे, म्हणून सरकारने उपलब्ध माहिती संशोधकांना द्यावी अशी मागणी केली आहे. अशाच प्रकारचा परग्रहावरील हल्ला शल्वाने द्वारकेवर केला असावा असा अंदाज थॉमसन यांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकरणात खोलवर संशोधनाची गरज आहे एवढे खरे!